डोंबिवलीत बिबट्याची कातडी हस्तगत…

Published:

डोंबिवली – बिबट्याची कातडी बाळगणाऱ्या दोघांना राम नगर पोलिसांनी अटक करून ५ लाखांची बिबट्याची कातडी हस्तगत केली. जयंतीलाल साळी आणि दिनेश जावरे अशी या दोघांची नावे आहेत.

डोंबिवली पूर्वेतील ९० फुट रस्त्याजवळ २ इसम बिबट्याची कातडी विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून सदर दोघांना अटक करून त्यांच्याकडून ५ लाखांची बिबट्याची कातडी हस्तगत केली.

सदरची यशस्वी कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वाय.पी.सानप, पोलीस हवालदार विशाल वाघ, हृषीकेश भालेराव, संजय पाटील यांनी केली.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page