निवासी नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात…

Published:

ठाणे – लाच घेताना एका निवासी नायब तहसीलदाराला अँटी करप्शन ब्युरो, ठाणे यांनी रंगेहात पकडले. वासुदेव बिसन पवार असे निवासी नायब तहसीलदाराचे नाव असून, ते तहसीलदार कार्यालय, ठाणे (वर्ग 2) येथे कार्यरत आहेत. १ लाख ४२ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने त्यांना रंगेहात पकडले.

तक्रारदार यांच्या परिचयाच्या व्यक्तीची शेतजमीन अकृषिक जमिनीमध्ये रूपांतरित करण्याकरीता वासुदेव बिसन पवार यांनी शासकीय फी व्यतिरिक्त रु. १,४२,०००/-  लाचेची मागणी करून सदरची १,४२,०००/- रुपये लाचेची रक्कम स्विकारल्यानंतर एसीबीने त्यांना रंगेहाथ पकडले. 

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page