डोंबिवली – मोबाईल चोरी करणा-या एका इसमास डोंबिवली पोलीसांनी अटक करून त्याच्याकडून चोरीचा मोबाईल हस्तगत केला.
फिर्यादी पदमाकर चौधरी हे त्यांच्या दुकानात असताना एका चोरटयाने बीअर घेण्यासाठी आल्याचा बहाणा करून फिर्यादींचा काउंटरवर असलेला एकूण ७०,०००/- रुपये किंमतीचा मोबाईल चोरी केला असल्याबाबत डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे कल्याण ठाकुर्ली परिसरातून सदर इसमास अटक करून त्याच्याकडून चोरीचा मोबाईल हस्तगत केला.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ३. कल्याण सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग सुनिल कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, पोनि (गुन्हे)/ तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि योगेश सानप, पोहवा विशाल वाघ, पोहवा सरनाईक, पोअ नितीन सांगळे, पो.ना. कोती यांनी केली.