मुंबई – मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर टोलचे दर पुन्हा वाढणार आहेत. १ एप्रिल पासून टोल दरात तब्बल १८ टकक्यांनी वाढ होणार आहे.
नव्या दरानुसार कारचा टोल २७० रुपयांवरून ३२० रुपये होणार आहे. तर, बससाठी टोलचा ७९७ वरुन ९४० रुपयांवर जाणार आहे. ट्रकसाठी ५८० रुपये द्यावे लागत होते. यापुढे ६८५ रुपये द्यावे लागणार आहे. तर टेम्पोसाठी ४२० रुपयांऐवजी ४९५ रुपये इतका टोल द्यावा लागणार आहे.
सन २००४ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या टोलमध्ये दर तीन वर्षांन १८ टक्के वाढ करण्याची अधिसूचना काढण्यात आली होती. त्यानुसार, २०२३ मधील टोलच्या दरात वाढ होत आहे. १ एप्रिल २०२३ ला लागू होणारे टोलचे दर हे २०३० पर्यंत कायम असतील, असे एमएसआरडीसीकडून सांगण्यात आले आहे.