गुन्हे शाखा घटक ३, कल्याण पोलिसांची कामगिरी…
कल्याण – जबरीने सोनसाखळी चोरी करणाऱ्या ४ सराईत इसमांना गुन्हे शाखा घटक ३, कल्याण पोलिसांनी अटक करून ६ गुन्हे उघडकीस आणून एकूण ५,१५,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
सलमान उर्फ राजकपुर असदउल्ला इराणी, हसन अजिज सय्यद, सावर रजा सय्यद इराणी, मस्तान अली दानअली इराणी अशी या चौघांची नावे आहेत. ठाणे जिल्हयातील विविध परिसरात महिलांची सोनसाखळी जबरीने चोरी करणारे सराईत चोरटे तसेच नागरिकांची बतावणी करून त्यांची फसवणूक करणारे सराईत इसम हे बनेली टिटवाळा परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून चौघांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण ७ तोळे ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, मोबाईल, गुन्हयात वापरलेले हत्यार चाकू, रोख रक्कम असा एकूण ५,१५,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच ६ गुन्हे उघडीस आणेल.
सदरची यशस्वी कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ पोलीस उप निरीक्षक मोहन कळमकर, सहा.पो.उप निरी. संजय माळी, पोहवा प्रशांत वानखेडे, पोहवा अनुप कामत, पोहवा बालाजी शिंदे, पोहवा विश्वास माने, पोहवा बापुराव जाधव, पोहवा गोरखनाथ पोटे, पोहवा विलास कडु पोहवा प्रविण बागुल, पोहवा किशोर पाटील, पोहवा रमाकांत पाटील, पोहवा प्रविण जाधव, पोहवा उल्हास खंडारे, चालक पोहवा अमोल बोरकर, मपोहवा मेघा जाने, पोना श्रीधर हुंडेकरी, पोना सचिन वानखेडे, पोशि गुरूनाथ जरंग, पोशि मिथुन राठोड, पोशि उमेश जाधव, पोशि गोरक्ष शेकडे, पोशि विनोद चन्ने, मपोशि मंगला गावित, यांनी केली.