KDMC हद्दीतील अनधिकृत बांधकाम प्रश्नी मनसे आमदार राजू पाटील यांनी विधानसभेत आवाज उठवला …
डोंबिवली – मनसे आमदार राजू पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केडीएमसी क्षेत्रातील अनधिकृत फेरीवाल्यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. याच अनुषंगाने महाराष्ट्र न्यूज ने बातमी प्रसारित केली होती. त्या बातमीत केडीएमसी क्षेत्रातील अनधिकृत बांधकामाविषयी भाष्य केले होते. ज्याप्रमाणे राजू पाटील यांनी अनिधकृत फेरीवाल्यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. त्याप्रमाणे त्यांनी केडीएमसी क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम यांसारख्या विषयांवरती देखील लक्ष द्यावे अशी विनंती करण्यात आली होती.
या विनंतीची दखल घेण्यात आली असून, विधानसभेत राजू पाटील यांनी केडीएमसी हद्दीतील अनधिकृत बांधकाम प्रश्नी मुद्दा उपस्थित केला. यासंदर्भात ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामासंदर्भात कारवाई करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येईल. सदर समितीमार्फत या विषयाच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही ३० दिवसांच्या आत करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.