मुंबई – माहीमच्या समुद्रातील अनधिकृत बांधकाम हटवण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार हे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.
गुढीपाडव्यानिमित्त झालेल्या सभेत राज ठाकरेंनी माहिमच्या खाडीवर अनधिकृत मजार बांधली असल्याचा व्हिडीओ त्यांनी दाखवला होता. तसेच हे अनधिकृत बांधकाम येत्या महिन्याभरात हटवले नाही तर त्याबाजूला सर्वांत मोठे गणपती मंदिर बांधलले जाईल, असा अल्टिमेटम राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानतंर मुंबई महापालिका आणि इतर यंत्रणा तत्काळ कार्यान्वित झाल्या आणि अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार हे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.