मोटार सायकल चोरी करणाऱ्यास अटक …

Published:

डोंबिवली – मोटार सायकल चोरी करणा-या एका इसमास डोंबिवली पोलीसांनी अटक करुन त्याच्याकडून ७०,००० /- रुपये किंमतीची मोटार सायकल हस्तगत केली.

फिर्यादी देवराज बारवाडी त्यांची मोटार सायकल सारस्वत बँकेच्या मेन गेटच्या समोर सिल्वर कॉईन बिल्डींग, पी.पी चेंबर जवळ, डोंबिवली पूर्व येथे पार्क करून बँकेत गेले असता कुणीतरी अज्ञात चोरटयाने फिर्यादी यांची ७०,०००/ रुपये किंमतीची मोटार सायकल चोरी केली होती. सदर बाबत डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हयाच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे तुकाराम रसाळ चाळ, लोढा, डोंबिवली पूर्व याठिकाणाहून मोटार सायकल चोरास अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेली मोटार सायकल हस्तगत केली.

सदरची यशस्वी कामगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -३, कल्याण सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग सुनिल कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, पोनि(गुन्हे)/तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि योगेश सानप, पोहवा  विशाल वाघ, पोहवा सचिन भालेराव, पोहवा भणगे, पोहवा लोखंडे पोअ राठोड, पो.अ गवळी, पो.ना. कोती यांनी केली.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page