ठाणे – अग्नीशस्त्रांची विक्री करण्यास आलेल्या इसमास ठाणे मालमत्ता गुन्हे शाखा पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून देशी बनावटीचे २ अग्नीशस्त्र मॅग्झीनसह तसेच ६ जिवंत काडतुसे असे जप्त केली. आकाश शिरसाठ असे त्याचे नाव आहे.
ठाणे रेल्वे स्टेशन, कोपरी पूर्व या ठिकाणी १ इसम अग्नीशस्त्र विकी करण्यास येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून आकाश शिरसाठ यास अटक करून त्याच्याकडून देशी बनावटीचे २ अग्नीशस्त्र मॅग्झीनसह तसेच ६ जिवंत काडतुसे जप्त केले.
दरम्यान, आकाश शिरसाठ हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी चाळीसगांव ग्रामीण पोलीस ठाणे, जळगांव येथे २ गुन्हे दाखल होते.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त, जय जीत सिंह, सह पोलीस आयुक्त दत्ता कराळे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे (गुन्हे), पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील (गुन्हे), सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपुत (गुन्हे शोध (२) यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे कक्षाचे वपोनिरी आनंद रावराणे, सपोनिरी जगदीश मुलगीर, पो.हवा राजेंद्र घोलप, पो.हवा अर्जुन करळे, पो.हवा रूपवंत शिंदे, पोहवा नगराज रोकडे, पोहवा संदीप भालेराव, पो.अं राजकुमार राठोड, मपोहवा आशा गोळे व चालक पो.अं सदन मुळे यांनी केली आहे.