मुंबई – खंडणी विरोधी कक्ष, गु.प्र.शा. पोलिसांनी एकूण १५ किलो ७४३ ग्रॅम वजनाचा ‘केटामाईन’ (कि.अं. रू. ७,८७,१५,०००/-) हा अंमली पदार्थ तसेच रु. ५८,३१,५००/- किंमतीच्या प्रतिबंधीत औषधे / गोळया (२३,४१० स्ट्रीप्स) हा अंमली पदार्थ जप्त करून दोघांना अटक केली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने गाळा क्र. ११०, श्री साईनाथ कॉ. आप.सो.लि., सोना उद्योग जवळ, पारसी पंचायत रोड, अंधेरी (पूर्व), येथून एकूण १५ किलो ७४३ ग्रॅम वजनाचा ‘केटामाईन’ आणि प्रतिबंधीत औषधे / गोळया (२३,४१० स्ट्रीप्स) जप्त करुन दोघांना अटक केली.