मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांना एका महिलेने १ कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला असून, सदर प्रकरणी संबंधित महिला आणि तिच्या वडिलांविरुद्ध मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिक्षा असे या महिलेचे नाव असून ती डिझायनर आहे.
माहितीनुसार अनिक्षा गेल्या काही महिन्यांपासून अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती आणि तिने अमृता यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. एका गुन्ह्यात मदत करण्याची मागणी करत 1 कोटी रुपयांच्या लाचेची ऑफर अमृता फडणवीस यांना अनिक्षा आणि तिच्या वडिलांनी दिली.
अनिक्षाने तिचे व्हिडीओ क्लिप, व्हॉईस नोट्स आणि अनेक संदेश एका अज्ञात फोन नंबरवरुन त्यांना पाठवले. अनिक्षा तिच्या वडिलांसोबत मिळून अप्रत्यक्षपणे अमृता यांना धमकी देत असल्याचे अमृता फडणवीस यांनी एफआयआरमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, पोलिसांनी अनिक्षा आणि तिच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.