मुंबई – विधानसभेत आज कामकाज सुरु झाले तेव्हा सात मंत्री अनुपस्थित होते. यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार चांगलेच सांतापले.
आज आठ लक्षवेधी होत्या. मात्र, सभागृहात मंत्री उपस्थित नसल्यामुळे सात लक्षवेधी पुढे ढकलण्याची नामुष्की आली असल्याचे अजित पवार म्हणाले. मंत्र्यांना विधीमंडळाच्या कामकाजात अजिबात रस नाही असे म्हणत अजित पवारांनी मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन जोरदार टीका केली.
मंत्र्यांना विधीमंडळाच्या कामकाजात अजिबात रस नाही. यांना बाकीच्या कामातच रस असल्याचे अजित पवार म्हणाले. यांना जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे. अस बोलायला आम्हालाही योग्य वाटत नाही. हे अतिशय गलिच्छपणाचं कामकाज चालले आहे. सभागृहात मुख्यमंत्री नसतील तर संसदीय कामकाज मंत्र्यांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे. सभागृहातील कामाकाजाला मंत्र्यांनी महत्त्व द्यायला हवे असे अजित पवार म्हणाले.