डोंबिवली – घरफोडी करणाऱ्या दोघांना मानपाडा पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून २१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. सरुद्दीन ताजुद्दीन शेख आणि महम्मद जिलानी इसा शहा अशी या दोघांची नावे आहेत.

मानपाडा सर्कल ते उसरघर या रस्त्यावरून पेट्रोलिंग करीत असताना, उसरघर गावा जवळ दिवा- मुंब्राच्या दिशेने एक मोटार सायकल येत होती. पोलीसांची गाडी पाहून सदर मोटार सायकलवर बसलेल्या दोघांनी मोटार सायकल तेथेच टाकून पळून जात असताना पोलिसांना दिसल्याने त्यांनी पाठलाग करून सदर दोघांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मानपाडा, टिळकनगर, डोंबिवली, विष्णुनगर पोलीस ठाणे तसेच ठाणे येथील नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केली असल्याचे सांगितले तसेच घरफोडी चोरी करण्यासाठी मुंब्रा येथून डोंबिवली शहरात येत असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडून ३५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे व ६२० ग्रॅम चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २१,९४,०००/- रु चा मुद्देमाल हस्तगत करून एकूण १२ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
तसेच हे दोघे अट्टल व सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याविरूद्ध बृहमुंबई पोलीस आयुक्तालयातील आगरीपाडा, सायन, एन. आय. आर. सागरी पो.स्टे. पायधुनी, सायन, ताडदेव, व्ही. पी. रोड, नागपाडा पोलीस ठाण्यात सुमारे २५ घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
सदरची यशस्वी कामगिरी दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, कल्याण, सचिन गुंजाळ, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ ३, कल्याण व सुनिल कुराडे सहाय्यक पोलीस आयुक्त, डोबिवली विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याचे वपोनिरी शेखर बागडे, सपोनिरी. दत्तात्रय सानप, सपोनिरी. सुनिल तारमळे, सपोनिरी अविनाश वनवे सपोनिरी सुरेश डाबरे, सपोउपनिरी भानुदास काटकर, पोहवा खिलारे, पोहवा गडगे, पोहवा ठिकेकर, पोहवा पवार, पोहवा पाटील, पोहवा माळी, पोहवा मासाळ, पोना कसबे, पोना भोईर, पोना किनरे, पोना पवार, पोना पाटील, पोना घुगे, पोशि मंझा, पोशि चौधर पोशि आहेर, पोशि आव्हाड यांनी केली.