मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना त्यांच्यावर स्टम्प आणि रॉडने हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात देशपांडे जखमी झाले. त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
![](https://maharashtranewschannel.com/wp-content/uploads/2023/02/b7bd1058-4a33-4832-ab62-607a1b03ae26-1024x565.jpg)
संदीप देशपांडे मॉर्निंग वॉकसाठी शिवाजी पार्कमध्ये गेले असता, तिथे एका टोळक्याने संदीप देशपांडे यांना स्टम्प आणि रॉडने मारहाण केली. आणि हल्लेखोर पसार झाले. या हल्ल्यात देशपांडे यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. हल्लेखोरांबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. पोलीस तपास करत आहते.