विरार शहरात साजरे झाले दिमाखदार कविसंमेलन…

Published:

विरार – लेखणी बोलते तेव्हा या साहित्य समूहाचे पहिले राज्यस्तरीय कविसंमेलन, आणि शिक्षक लेखक निलेश गुरुनाथ कांता हेंबाडे यांच्या “अस्तित्वाच्या पाऊलखुणा” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा विरार शहरात उत्साहात साजरा झाला.

 “अस्तित्वाच्या पाऊलखुणा” लेखक् निलेश गुरुनाथ कांता हेंबाडे, यांच्या वैचारिक लेख संग्रहाचे प्रकाशन समयी.प्रमुख अतिथी कवयित्री ,लेखिका प्रिया गावडे,लेखिका वैशाली ठक्कर- पाटील ह्या उपस्थित होत्या.कार्यक्रमासाठी ईशस्तवन् कवयित्री अंजली तरे,आप्पा तरे यांनी तर स्वागतगीत् कवयित्री पूजा काळे यांनी म्हटले.सुत्रसंचालन कवी योगेश गोतारणे, आभार प्रदर्शन कावयित्री किशोरी पाटील यांनी मानले.

या कार्यक्रमात अनेक कवींनी सहभाग घेतला. लेखणी बोलते तेव्हा साहित्य समूहाचे स्थापक निलेश हेंबाडे यांनी 11 कवींना पुरस्कार देऊन त्यांच्या  लेखणीचा गौरव केला. सदर समेलनास ख्यातनाम कवीं/कवयित्रिना निमंत्रित करण्यात आले होते.

कवयित्री किशोरी पाटील – पालघर.

कवयित्री अमृता संखे -पालघर

पत्रकार /जेष्ठसाहित्यिक /कवी रविंद्र यशवंतराव(देशमुख)-मुरबाड (ठाणे)

कवी संजय दत्तात्रय सांगोलकर, सोलापूर.,कवयित्री कल्पना देशमुख, नवी मुबंई

कवी योगेश नंदा तुकाराम गोतारणे, विरार ,कवयित्री नेहा धारूळकर पालघर,कवी आप्पा गजानन तरे-पालघर ,कवयित्री अंजली तरे -पालघर ,कवयित्री संजना संजय वेतूरकर पालघर,कवयित्री सरोज सुरेश गाजरे -भाईंदर ,कवी नितीन झुंबरलाल खंडागळे-अंबरनाथ ,कवयित्री कालिंदी अशोक वाणी, डोंबिवली ,कवी लक्ष्मण शेडगे -पालघर_कवयित्री सुवर्णा पवार -कोल्हापूर, कवयित्री कल्पना म्हापुस्कर मिरा रोड.ठाणे ,कवी राकेश प्रभावती बुधाजी डाफळे, विरार-पालघर, कवयित्री पूजा अ. काळे, बोरीवली, कवयित्री स्मिता अनिल गायकवाड, रायगड कवी विजय जोगमार्गे, पालघर इत्यादी कवींनी आपल्या कवितां सादर करून, जेष्ठ नागरिक सभागृहाचा परिसर कवितामय केला. त्याबद्दल परिसरातील नागरिक व साहित्यप्रेमींनी “लेखणी बोलते तेव्हा “या साहित्य समूहाचे तोंडभरून कौतुक केले, तसेच शंकर भोईर, ज्ञानेश्वर कोरडे, निर्वी निलेश हेंबाडे,वृषाली भोईर,गायत्री हेंबाडे, सुरक्षा भोईर, मयूरी देवीकर, मानसी तरे, मानिनि तरे, कवि लक्ष्मन शेडगे सर्वानी यथायोग्य सहकार्य केले. एकूणच हा सोहळा अगदीच उत्साह आणि स्फूर्तीने पार पडला.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page