दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या तिघांना अटक…

Published:

पालघर – दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखा पालघर पोलिसांनी अटक केली. राम काकड़, गुरुनाथ झुगरे, नितेश मोडक अशी या तिघांची नावे आहेत. तसेच पोलीस चौकशीत या तिघांनी ३८ दुचाकी चोरल्याचे उघड झाले आहे.

बोईसर एमआयडीसी परीसरात गुन्हे वॉच पेट्रोलिंग करत असताना कॅम्लीन नाका ते नवमी हॉटेलकडे जाणाऱ्या रोडवर राम काकड़, गुरुनाथ झुगरे, नितेश मोडक हे तिघे बिगर नंबर प्लेटच्या २ मोटार सायकलसह उभे असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ कोयता,  कटावणी, मिरची पुड, दोरी, कटर, स्क्रू डायव्हर अशी हत्यारे मिळून आली.

त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी बोईसर एमआयडीसी मधील फास्ट टेकइंजिनिअर्स प्रा.लि. प्लॉट नंबर ए-२२ कंपनीतील तांब्याचे धातूचे साहित्य चोरी करण्यासाठी आल्याचे सांगीतले. सदर प्रकरणी त्यांच्याविरुद्ध बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यांच्याकडे केलेल्या अधिकच्या चौकशीत त्यांनी त्यांच्या अन्य साथीदारांसह मिळून पालघर, ठाणे ग्रामीण, नाशिक ग्रामीण, मिरा-भाईंदर, वसई-विरार  परीसरातून अनेक मोटार सायकली चोरी करुन त्या जव्हार, शहापुर परीसरात विक्री केल्याचे सांगितले. सदर प्रकरणी पोलिसांनी चोरी केलेल्या एकूण १९,६०,०००/- रुपये किंमतीच्या ३८ मोटार सायकल हस्तगत केल्या आहेत.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page