मुंबई – रिक्षा चोरी करणाऱ्या दोघांना एम.एच.बी पोलिसांनी अटक केली. अब्दुल अब्दुल अजीज मोमीन आणि भूषण लिंगपल्ली उर्फ शैलेश लिंगमपल्ली अशी या दोघांची नावे आहेत.

फिर्यादी अजय कुमार अभिमन्यू यादव हे त्यांची रिक्षा कॅन्सर हॉस्पिटल, दहिसर पश्चिम, मुंबई येथे पार्क करून जेवण करण्यासाठी गेले असता, कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांची ऑटो रिक्षा चोरी केली असल्याबाबत एम.एच.बी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून अब्दुल अब्दुल अजीज मोमीन आणि भूषण लिंगपल्ली उर्फ शैलेश लिंगमपल्ली या दोघांना अटक केली. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी नवघर पोलीस ठाणे,भाईंदर,कांदिवली पोलीस ठाणे, जुहू पोलीस ठाणे तसेेच एम.एच.बी पोलीस ठाणे हद्दीतूून ऑटो रिक्षा चोरी केल्याचे समोर आले आहे.