डोंबिवली – बनावट चावीच्या आधारे घरफोडी करणारा १ इसम आणि विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून डोंबिवली पोलीसांनी २,१०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
फिर्यादी पूजा शृंगारे यांच्या कपाटाची बनावट चावी तयार करून कपाटाच्या लॉकर मधील एकूण २,१०,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेले असल्याबाबत डोंबिवली पोलीस ठाणे गु.र.क.:- ६५/२०२३ ३८०, ४५४, ४५७ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाच्या तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी फिर्यादी यांची बहीण नमीता शृंगारे व त्यांचा भाचा प्रेम शृंगारे या दोघांकडे चौकशी केली असता त्यातील प्रेम शृंगारे याने त्याचा मित्र अनिकेत खंडागळे याच्या मदतीने फिर्यादी यांच्या कपाटाची व लॉकरची बनावट चावी तयार करून त्याआधारे कपाटातील लॉकर मधून दागिने चोरी केल्याची कबुली दिली. त्याप्रमाणे पोलिसांनी अनिकेत खंडागळे यास तांत्रिक मदतीच्या आधारे खंबाळपाडा, ठाकुर्ली पूर्व येथून ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरी केलेले एकूण २.१०,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ कल्याण सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग सुनिल कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, पोनि सरडे, पोनि तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि योगेश सानप, सपोनि वळवत भराडे, पोहवा विशाल वाघ, पोहवा प्रशांत सरनाईक पोअ शिवाजी राठोड, नितीन सांगळे, पो.अ. निलेश पाटील, पो.ना. दिलीप कोती पो.ना रायते यांनी केली.