ठाणे – मोलकरणीने चोरी केलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम चितळसर पोलीसांनी हस्तगत केले आहेत. अर्चना नवनाथ सावंत असे या मोलकरणीचे नाव आहे.
फिर्यादी प्रियंका प्रसाद या त्यांचे पती आणि मुलांसह जर्मनी येथे सहलीसाठी गेल्या होत्या. त्यादरम्यान घरात त्यांचे सासु-सासरे, आई-वडील होते. फिर्यादी या सहलीवरुन परत आल्यानंतर त्यांना त्यांच्या आईच्या मोबाईलवर आलेल्या मॅसेजवरुन बँक खात्यातून एटीएम द्वारे १०,०००/-रु. काढल्याचे समजले तसेच घरातील सोन्याचे दागिने व एटीएम कार्ड दिसून आले नसल्याबाबत त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३२/२३ भादविक. ३८१ प्रमाणे नोंद करण्यात आला होता.
तसेच घरात घरकाम करणारी महिला अर्चना सावंत हिने हे दागिने आणि रोख रक्कम चोरी केला असल्याचा संशय फिर्यादी यांनी व्यक्त केल्याने पोलिसांनी त्याअनुषंगाने दिवा भागातून अर्चनाचा शोध घेऊन तिला ताब्यात घेऊन तिच्याकडे चौकशी करून तिच्याकडून १०,०००/- रु. रोख, एटीएम कार्ड, १,०२,७००/- रु. किंमतीचे १८ ग्रॅम ४०९ मिली वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण १,१२,७००/- रु.चा मुद्देमाल हस्तगत केला.