पुण्यातील जमीन खरेदी-विक्री व्यवहारामध्ये मुद्रांक शुल्क चुकविल्याप्रकरणी चौकशीसाठी समिती…

Published:

mumbai – पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीन खरेदी-विक्री व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणावर मुद्रांक शुल्क चुकविल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक सुहास दिवसे यांच्यामार्फत सह नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक अधीक्षक (मुख्यालय), पुणे राजेंद्र मुठे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे.

नोंदणी उपमहानिरीक्षक (मुख्यालय), पुणे उदयराज चव्हाण, नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक, पुणे विभाग, धर्मदेव माईनकर, सह जिल्हा निबंधक वर्ग-1, पुणे शहर संतोष हिंगाणे, सहाय्यक्र नोंदणी महानिरीक्षक तथा कार्यासन अधिकारी क्र.4. नोंदणी महानिरीक्षक कार्यालय, पुणे अनुजा कुलकर्णी, अति. कार्य. सहाय्यक नोंदणी महानिरीक्षक तथा कार्यासन अधिकारी क्र. 12, नोंदणी महानिरीक्षक कार्यालय, पुणे संजय पाटील हे या समितीचे सदस्य आहेत.

या समितीने या प्रकरणी सखोल चौकशी करुन सविस्तर अभिप्रायासह आपला अहवाल 7 दिवसांत सादर करावयाचा आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page