pune – देवदर्शनाला जाणाऱ्या गाडीचा भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात ६ ते ७ महिलांचा मृत्यू झाला आहे. तर, १५ ते २० महिला जखमी झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण जिल्ह्यातील पाईट (ता. खेड) येथे श्री. क्षेत्र कुंडेश्वराच्या दर्शनासाठी महिलांना घेऊन जाणारी पिकअप गाडी खोल दरीत कोसळली. श्रावणी सोमवार असल्याने या महिला श्री क्षेत्र कुंडेश्वराच्या दर्शनासाठी पिकअप गाडीने जात होत्या त्यावेळी नागमोडी वळणावर घाट चढताना पीकअप माग सरकले आणि खोल दरीत जाऊन कोसळले.
या अपघातात ६ ते ७ महिलांचा मृत्यू झाला तर, १५ ते २० महिला जखमी झाल्या आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.