pune – वैष्णवी हगवणेच्या बाळाला अखेर तिच्या आईवडिलांकडे सोपवण्यात आलं आहे. वैष्णवी हगवणेंच्या मृत्यूनंतर तिच्या बाळाला घरी आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते, बाळाचा ताबा कस्पटे कुटुंबियांना मिळत नव्हता. खेर त्या बाळाचा ताबा कस्पटे कुटुंबियांना मिळाला आहे.
राष्ट्रवादीचा बडतर्फ सदस्य राजेंद्र हगवणे आणि कुटुंबीयांच्या त्रासाला कंटाळून त्यांची सून वैष्णवी हगवणेने आत्महत्या केली होती. त्यानतंर वैष्णवीचं बाळ तिचा नवरा शशांकने त्याचा मित्र निलेश चव्हाणकडे दिल्याचा आरोप कस्पटे कुटुंबियांनी केला होता. तसेच बाळ आणण्यासाठी कस्पटे कुटुंब गेले असता त्यांना बंदुकीचा धाक दाखवला गेला, असा आरोप देखील करण्यात आला होता. अखेर वैष्णवीचं बाळ तिच्या आई वडिलांकडे सोपवण्यात आले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांना याप्रकरणी फोन केला होता. या प्रकरणात इतर कारवाई होत असताना तिचं बाळ कुठे आहे, याचा तातडीने शोध घ्या आणि ते तिच्या आईच्या कुटुंबीयांना सुपूर्द करा, अशी विशेष सूचना दिली होती. त्याचप्रमाणे वैष्णणीच्या आत्महत्येप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशसुद्धा त्यांनी पोलिसांना दिले आहेत.
माहितीनुसार, वैष्णवीचं बाळ राजेंद्र हगवणे यांच्या मावस भावाकडे होते. याप्रकरणात हगवणे कुटुंबातील ३ आरोपी अटक आहेत आणि २ फरार आहेत.