dombivali – खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुनील खर्डीकर यांना ‘पुढारी’ कल्याण-डोंबिवली आयकॉन पुरस्कार राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
पुढारी वृत्तसमूहाने ८६ व्या वर्षात पर्दापण केले असून, यानिमित्ताने पुढारी कल्याण डोंबिवली आयकॉन या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन ३१ जानेवारी रोजी डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले रंगमंदिरात करण्यात आले होते. या सोहळ्यात कल्याण-डोंबिवली शहरातील विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांचा कल्याण-डोंबिवली आयकॉन पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्यावेळी खर्डीकर यांना शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.

तसेच भिवंडी महापालिकेचे आयुक्त अजय वैद्य, खेळाडू अर्णव भोईर, समाजसेवक गोरखनाथ ऊर्फ बाळा म्हात्रे आणि इतर अनेक मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या सोहळ्यास राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, कल्याण पूर्वच्या आमदार सुलभाताई गायकवाड, भिवंडी-निजामपूर महापालिकेचे आयुक्त अजय वैद्य प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

खर्डीकर क्लासेसची शान डॉ.सुनील खर्डीकर यांनी या क्लासेसच्या माध्यमातून अनेक गुणवंत विदयार्थी घडवले आहेत. खर्डीकर क्लासेसच्या शाखा केवळ डोंबिवलीतच नाही तर ठाणे, पालघर, नवी मुंबई, भिवंडी अशा अनेक भागात कार्यरत आहेत.