jalgaon – जळगावातील परांडा स्टेशनजवळ मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. पुष्पक एक्स्प्रेसमध्ये प्रवास कऱणाऱ्या काही प्रवाशांनी आग लागल्याची भीतीने रेल्वेतून खाली उड्या मारल्या. मात्र याच वेळी समोरुन येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने या प्रवाशांना उडवलं.
मिळालेल्या माहितीनुसार, परांडा रेल्वे स्थानकाजवळ आल्यानंतर पुष्पक एक्सप्रेस गाडीने ब्रेक मारल्यानंतर चाक आणि रुळाचे घर्षण झाले आणि जाळ निघाला. हा जाळ पाहून दारात बसलेल्या प्रवाशांना वाटले गाडीला आग लागली. त्यामुळे त्यांनी गाडीला आग लागल्याची बातमी रेल्वेमध्ये पसरली. या आगीच्या भितीने पुष्पक एक्सप्रेसमधील काही प्रवाशांनी गाडीतून रुळावर उड्या मारल्या.
त्याचवेळी दुसऱ्या दिशेने भरधाव वेगाने कर्नाटक एक्सप्रेस येत होती. अचानक प्रवाशांनी रुळावर उड्या मारल्याने अनेक प्रवासी कर्नाटक एक्सप्रेसखाली चिरडले गेले आहेत. या अपघातात अनेक प्रवासी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाचे जवान आणि प्रशासन दाखल झाले असून, मदतकार्य सुरु आहे.