सुप्रीम कोर्टाचं अधिकृत यूट्यूब चॅनल हॅक…

Published:

नवी दिल्ली – सुप्रीम कोर्टाचं अधिकृत यूट्यूब चॅनल हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यावर कोर्टातील सुनावणींच्या थेट प्रक्षेपणाऐवजी XRP या अमेरिकन कंपनीने विकसित केलेल्या क्रिप्टोकरन्सीची जाहिरात करणारे व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आले आहेत. जी यूएस-आधारित कंपनी Ripple Labs ने विकसित केली आहे.

सुप्रीम कोर्ट संविधान पीठांसमोर असलेल्या प्रकरणांच्या सुनावणी तसेच सार्वजनिक हिताच्या मुद्द्यांसाठी यूट्यूब चॅनेलचा वापर करून सुनावण्या थेट प्रसारित करत होते. अलीकडेच, RG कर मेडिकल कॉलेज आणि कोलकता हॉस्पिटलमधील बलात्कार आणि खून प्रकरणातील सुओ मोटो प्रकरणाच्या सुनावण्या यूट्यूब चॅनेलवर थेट प्रसारित करण्यात आल्या होत्या.

दरम्यान, हॅकर्सनी पूर्वीच्या सुनावणींचे व्हिडिओ प्रायव्हेट केले असल्याचे दिसत आहे. सध्या हॅक झालेल्या चॅनेलवर Brad Garlinghouse: Ripple Responds To The SEC’s $2 Billion Fine! XRP PRICE PREDICTION या नावाचे एक रिकामे व्हिडिओ थेट प्रक्षेपित होत आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page