नवी दिल्ली – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून याची घोषणा केली.
आडवाणी यांनी भारतीय राजकारणात एक वेगळा ठसा उमटवला. लालकृष्ण अडवाणी यांनी भाजपच्या स्थापनेपासून सर्वाधिक काळ पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम केलं.खासदार म्हणून ते जवळपास तीन दशकं संसदीय राजकारणात सक्रीय होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये अडवाणी यांनी देशाचं उपपंतप्रधान पद भूषवलं होतं.