नवी दिल्ली – समलिंगी विवाहाच्या याचिकेवर सुनावणी घेताना सुप्रीम कोर्टाने मोठा निकाल दिला आहे. भारतात समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. कायदा करण्याचा अधिकार संसदेकडे असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.
पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने हा ऐतिहासिक निर्णय दिला. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड, न्यायमूर्ती एस के कौल, न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा, न्यायमूर्ती रविन्द्र भट आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या घटनापीठाने हा निकाल दिला आहे.
हे प्रकरण संसदेच्या अखत्यारित येते, केंद्र सरकारची समिती समलैंगिकतेच्या संदर्भात निर्णय घेईल असे सुप्रीम कोर्टाने निकाल देताना म्हटले आहे.