चेन्नई – तामिळनाडू मधील मदुराई स्टेशनवर पुनालुर-मदुरै एक्स्प्रेस ट्रेनच्या डब्याला भीषण आग लागल्याची घटना घडली असून, या घटनेत ९ जणांचा मृत्यू तर २० जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार हि ट्रेन लखनऊहून रामेश्वरमला जात होती. त्यावेळी मदुराई रेल्वे स्थानकावर सकाळी ५. १५ वाजताच्या सुमारास ट्रेन थांबली असता, एका डब्याला आग लागली. या डब्यात यात्रेकरू होते आणि ते उत्तर प्रदेशातून प्रवास करत होते. त्यांनी कॉफी बनवण्यासाठी गॅसची शेगडी पेटवण्याचा प्रयत्न केला असता सिलिंडरचा स्फोट झाला आणि आग लागली.
दरम्यान, बचावकार्य सुरु असून, आतापर्यंत ५५ जणांना वाचवण्यात यश आले असून ९ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच आग आटोक्यात आली असून इतर डब्यांचे कोणतेही नुकसान झालेले नाही.