भारताची चंद्र मोहीम चांद्रयान- ३ यशस्वी ठरली आहे. भारताचे चांद्रयान हे चंद्रावर अत्यंत यशस्वीपणे उतरले आहे. इस्रोचे चांद्रयान- ३ आज २३ ऑगस्ट रोजी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरले आहे.
या यशस्वी मोहीमेमुळे आता चंद्रावर पाऊल ठेवणारा भारत चौथा देश ठरला आहे. आतापर्यंत रशिया, चीन आणि अमेरिका चंद्रावर यशस्वी उतरण्यात यश मिळाले. तसेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ठरला आहे.
इस्त्रोच्या या कामगिरीचे भारतासह संपूर्ण जगभरातून कौतूक होत आहे. भारतामध्ये जल्लोष आणि उत्साहाचे वातावरण आहे.
दरम्यान, चांद्रयान-३ मिशन १४ जुलै २०२३ रोजी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी लॉन्च झाले होते. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे अंतराळयान प्रक्षेपित करण्यात आले होते.