मिझोराम – बांधकाम सुरू असलेला रेल्वे पूल कोसळला असून, या घटनेत १७ कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मिझोरमची राजधानी आयजोल पासून २१ किमी अंतरावर असलेल्या सायरंगमध्ये हा अपघात झाला. बैराबी ते सायरंग जोडणाऱ्या कुरुंग नदीवर हा पूल बांधण्याचे काम सुरु होते त्यावेळी हा अपघात घडला. त्यावेळी पुलावर ३५ ते ४० मजूर काम करत होते. यातील १७ कामगारांचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.