बदलापूर – बदलापूर पूर्व परिसरात इमारतीच्या ८ व्या मजल्यावरून लोखंडी सळई पडून एका कामगाराच्या खांद्यात आरपार घुसली असल्याची घटना घडली असून, सदर कामगाराला गंभीर दुखापत झाली आहे. हि घटना माऊली चौकात असलेल्या ठाणेकर पॅराडाइज या नवीन इमारतीत घडली. या इमारतीचे बांधकाम सुरु आहे.
दरम्यान, कामगाराला रुग्णालयात दाखल करण्यात असून, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास सुरु आहे.