Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
कोल्हापूर

व्यापाऱ्यांचे ५५ लाख घेऊन एकजण पसार….

गांधीनगर येथील दोन व्यापाऱ्यांनी बँकेत भरण्यासाठी दिलेली एकूण ५५ लाखाची रक्कम बँकेत न भरता परस्पर लंपास करून जाताना एक चारचाकी गाडी चोरून नेली आहे. याबाबत रोख रक्कमेसह एकूण ६० लाखाचा मुद्देमाल चोरून नेल्याचा गुन्हा गांधीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. गांधीनगर येथील नितीन ट्रेडर्स या प्रकाश रमेश वादवानी यांच्या फर्ममधील ३५ लाख रुपये व भगवानदास कुकरेजा यांच्या संतोष फुटवेअर या फर्ममधील २० लाख रुपये मोहन सिंग (पूर्ण नाव माहीत नाही) याच्याकडे तारीख १ जुलै २०१९ रोजी बँकेत भरण्यासाठी दिले असता ते बँकेत न भरता परस्पर लंपास करून पळून गेला आहे. त्याने जाताना निल सिंग राजपूत याची बलेनो गाडी नेली आहे. या बाबतची फिर्याद प्रकाश रमेश वादवानी यांनी दिली असून मंगळवारी ९ जुलैच्या रात्री गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या बाबत गांधीनगर पोलिसांनी व फिर्यादीने दिलेली अधिक माहिती अशी की,गांधीनगर येथे तीन वर्षांपूर्वी राहण्यास आलेल्या मोहन सिंग याचे शिवशक्ती नोव्हेलटी नावाचे दुकान आहे.त्याने भगवानदास कुकरेजा यांच्या ओळखीतून त्यांचा व फिर्यादी प्रकाश वादवानी यांचा विश्वास संपादन केला. १ जुलै रोजी भगवानदास कुकरेजा व प्रकाश वादवानी यांनी दोघांची मिळून ५५ लाख रुपये रक्कम बँकेत भरण्यासाठी मोहन सिंग यांच्याकडे दिले.पण त्याने बँकेत पैसे न भरता परस्पर, त्याचाच नातेवाईक असणाऱ्या निलसिंह राजपूत यांची बलेनो गाडी घेऊन पसार झाला. ही बाब २ जुलै रोजी भगवानदास व प्रकाश यांच्या लक्षात आली. त्यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. परंतु एवढ्या मोठ्या रक्कमेची फसवणूक झाल्याने गुन्हा नोंद करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाची परवानगी आवश्यक असल्याने ९ जुलै रोजी रात्री गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास गांधीनगर पोलीस करत आहेत.

Related Articles

Close