Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
मनोरंजन

पुण्यात रंगली सुरेल मैफल….

पुण्यातील कोथरूड येथे युवा कला उत्सवात आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात अविस्मरणीय संगीत मैफल रंगली. या कार्यक्रमाचा शुभारंभ गायक बापू चौधरी यांच्या शास्त्रीय गायनाने करण्यात आला. या वेळी संवादिनीवर अमोल मोरे आणि तबल्यावर गोपाळ धुमाळ यांनी संगीत साथ केली. विशेषतः या संगीत मैफलीत छोटे उस्ताद कु.सोहम गोराणे याने केलेल्या तबला वादनाने मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या रसिकांना मंत्रमुग्ध केले. रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रचंड प्रतिसाद दिला. या विभागातील तरूण पिढीला संगीत गायन वादना कडे आकर्षित करण्यासाठी आणि युवा कलाकार मंडळींना व्यासपीठ मिळावे या हेतूने कोथरूड परिसरात अशा प्रकारच्या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात सुप्रसिद्ध तबलावादक गोपाळ धुमाळ यांचा सिंहाचा वाटा असतो. या कार्यक्रमाला ज्येष्ठ कलावंत पंडित विठ्ठल क्षीरसागर, पांडुरंग पवार, अशोक मोरे, नितीन निघोजकर, अॅड.राहूल म्हस्के, दत्तात्रय (नाना) मारणे, शांताराम दादा इंगवले, अंकुश मोरे, बाळासाहेब कोंडे, ह.भ.प.चंद्रकांत वांजळे, ह.भ.प.गणेश कारले आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Close