Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
मुंबई

गीतांजली रेल्वे नाला धोकादायक….

जोगेश्वरी पूर्व येथील गीतांजली रेल्वे कॉलनी येथे असणाऱ्या मुख्य रस्त्यावर मधोमध एक मोठा नाला आहे या नाल्यावरील रस्ता खूपच खचला असल्याने या ठिकाणी याला भगदाड पडून कोणत्याही क्षणी या ठिकाणी दुर्घटना घडून मोठी जीवितहानी होऊ शकते. कारण हा रस्ता थेट जोगेश्वरी रेल्वे स्थानकापाशी जात असल्याने दररोज हजारो नागरीक येथून प्रवास करीत असतात, जवळच असलेल्या गीतांजली रेल्वे कॉलोनीतील लोकांचा पण हा हमरस्ता आहे, या ठिकाणच्या कॉलनीत जवळजवळ दोनशे ते तीनशे कुटुंब वास्तव्यास आहेत,नाल्यावरील रस्ता पूर्णपणे जुना झालेला असून त्यातून लोखंडी सळ्या बाहेर आलेल्या आहेत व नाल्याचे कठडे देखील भेगा पडलेल्या अवस्थेत आहेत. सध्या पावसाळ्यात येथे नाल्याच्या मध्यभागी खूप पाणी साठत असल्याने व त्याचा निचरा होत नसल्याने तो कधीही कोसळू शकतो, तेव्हा रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याची त्वरीत पाहणी करून लवकरात लवकर याची डागडुजी करावी अशी मागणी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांनी केली आहे,अन्यथा येथे होणाऱ्या दुर्घटनेची जबाबदारी रेल्वे प्रशासन घेणार का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे,तसेच स्थानिक लोकप्रतिनिधीनी ताबडतोब त्यांच्या परीने त्यांच्या स्तरावर रेल्वेच्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करावा व येथे होणाऱ्या संभाव्य दुर्घटनेची कल्पना त्यांना द्यावी अशी मागणी केली आहे.

Related Articles

Close