Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
ठाणे

गांजा विक्री करण्यासाठी परराज्यातून आलेल्या एका इसमास अटक….

गांजा विक्री करण्यासाठी परराज्यातून आलेल्या एका इसमास अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. प्रकाश मोतीराम पवार असे या अटक आरोपीचे नाव आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त करत असताना. या गस्ती दरम्यान एक इसम काळसेकर हॉस्पिटल गेटसमोर, वाय जंक्शन, शीळ - मुंब्रा रोड, मुंब्रा ठाणे येथे पोलिसांना बघून पळून जाताना दिसला सदर पळून जाणाऱ्या इसमाला पोलिसांनी पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव प्रकाश मोतीराम पवार रा. हैद्राबाद (तेलंगणा) असे सांगितले. पोलिसांनी त्याची झडती घेऊन त्याच्याकडून तब्ब्ल १० किलो ५०० ग्रॅम वजनाचा गांजा (अंमली पदार्थ) व इतर वस्तू असा एकूण १,६९,५००/- रु. चा मुद्देमाल हस्तगत केला तसेच त्याने त्याच्या राहत्या गावी लपवून ठेवलेला सुमारे १५ किलो वजनाचा गांजा देखील हस्तगत केला. याप्रकरणी एकूण सुमारे २५ किलो वजनाचा ४,००,०००/- रु. किंमतीचा गांजा त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला. त्याला अटक करून त्याच्यावर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Related Articles

Close