Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
ठाणे

वाहनांचा अपहार करून विक्री करणाऱ्या दोघांना अटक…..

ठाण्यात फायनान्स कंपनीच्या वाहनांचा अपहार करून विक्री करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, साई पॉईंट फायनान्स कंपनीच्या क्रेडिट मॅनेजर पदावर नोकरीला असणारे जयप्रकाश शालिकराम तिवारी यांनी त्यांच्या फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या रिकव्हरी कलेक्शन हेड दिपकसिंग रावत यांना कंपनीकडून टू व्हीलर वाहनांवरील कर्जामधील थकीत वाहने ताब्यात घेऊन कंपनीच्या काल्हेर भिवंडी येथील गोडाऊनमध्ये जमा करण्याबाबत सांगितले असताना त्याने आणि एजंट अजगर सत्तार खान या दोघांनी आपसांत संगणमत करून फायनान्स कंपनीकडून ज्या ग्राहकांनी कर्जावर घेतलेल्या वाहनांचे हफ्ते भरलेले नाहीत अशा ग्राहकांच्या मोटारसायकल परस्पर ताब्यात घेऊन कंपनीला कोणत्याही प्रकारे माहिती न देता सदरच्या मोटारसायकल परस्पर विक्री केल्या. आणि विक्री केलेल्या वाहनाची रक्कम कंपनीच्या लोन खात्यात जमा करणे आवश्यक असताना सदरची रक्कम त्यांनी स्वतःच्या फायद्या करीता वापरून कंपनीच्या रक्कमेचा अपहार केला म्हणून याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने नौपाडा पोलिसांनी दिपक देवेंद्रसिंह रावत आणि मोहम्मद असगर सत्तार खान या दोघांना अटक करून त्यांच्याकडून परस्पर विक्री केलेल्या ६,२५,०००/- किंमतीच्या एकूण १७ मोटारसायकल जप्त केल्या आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साळुंखे करत आहेत.

Related Articles

Close