Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
मुंबई

चोरीचे मोबाईल फोन विकण्यासाठी आलेल्या एकाला अटक….

सुरत (गुजरात) मधून चोरीचे मोबाईल फोन विकण्यासाठी आलेल्या एका इसमास अटक करण्यात गुन्हे शाखा कक्ष ११ मुंबई पोलिसांना यश आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, गुन्हे शाखा, कक्ष ११ च्या पथकास गुप्त बातमीदारांमार्फत काही इसमांनी सुरत येथे मोबाईल दुकानांमध्ये मोबाईल चोरी करून त्यातील एक इसम ते चोरीचे मोबाईल फोन मुंबईतील कांदिवली रेल्वे स्टेशन परिसरात विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. या मिळलेल्या माहितीवरून सदर ठिकणी सापळा रचून पोलिसांनी ३५,०००/- रु. किंमतीचे चार चोरीच्या मोबाईलसह एका इसमास ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे चौकशी केली असता सदर प्रकरणी लिंबायत पोलीस ठाणे सुरत (गुजरात) येथे सदर गुन्ह्याची नोंद असल्याचे कळले. तसेच त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता सदर इसम व त्याचे साथीदार दिल्ली येथे राहणारे असून ते वेगवेगळ्या ठिकाणी कॅटरिंग सर्व्हिसमध्ये वाढप्याचे काम करत संधी मिळताच चोरी करतात. या चोरीतही दुकानातील २० मोबाईल आणि रोख रक्कम चोरी केल्याची माहिती दिली आहे. सदर आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी लिंबायत पोलीस ठाणे, सुरत (गुजरात) यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Related Articles

Close