Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
ठाणे

पत्नीवर खुनी हल्ला करून फरार असलेल्या पतीस अटक….

आपल्या पत्नीवर खुनी हल्ला करून पाच महिन्यांपासून फरार असलेल्या पतीस अटक करण्यात कासारवडवली पोलिसांना यश आले आहे. अशोक यमनप्पा हरिजन असे या अटक पतीचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे की, कर्नाटक राज्यातून कामासाठी आलेली त्याची पत्नी शोभा अशोक हरिजन ही आणि तिचा मामा दुन्डप्पा बसप्पा कट्टमणी आपल्या घरी असताना पती अशोक हा तिला जबरदस्तीने आपल्या सोबत गावी घेऊन जात होता. परंतु अशोक त्रास देत असल्याने शोभा त्याच्यासोबत जाण्यास तयार नव्हती तसेच या कारणांमुळे तिचा मामा दुन्डप्पा कट्टमणी देखील याला विरोध करत होता. त्यामुळे याचा राग आल्याने अशोकने ऊस तोडण्याचे धारदार शस्त्र हातात घेऊन तिच्या आणि तिच्या मामाच्या अंगावर वार करून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याचा गुन्हा दुन्डप्पा बसप्पा कट्टमणी याने कासारवडवली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर नोंदविण्यात आला. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने बातमीदाराकडून अशोक हरिजन हा इंडी, जिल्हा विजापूर, राज्य कर्नाटक येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सदर ठिकाणी सापळा रचून अशोक हरिजन यास अटक करण्यात आली असून त्याने गुन्ह्यात वापरलेले धारदार हत्यार देखील जप्त करण्यात आले आहे.

Related Articles

Close