Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
Breaking News

कल्याणमध्ये काल तरुणीवर झालेला हल्ला तिच्या नवऱ्यानेच केला….

कल्याणमध्ये काल ' सनम कटोरीया ' या तरुणीवर झालेला हल्ला तिच्या नवऱ्यानेच केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, कल्याणमध्ये काल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी मार्केट) परिसरात उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या सनम करोटीया या ३० वर्षीय तरुणीची दिवसाढवळ्या धारदार शास्त्राने वार करून हत्या केल्याची घटना घडली होती.याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी दोघांपैकी एक आरोपी बाबू धकनी याला काल अटक केली होती. याप्रकरणी आता दुसरा आरोपी दिपक ठाकूर यांस आज बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे हे दोघेही सराईत गुन्हेगार असून या हत्येमागचे कारण पोलिसांनी स्पष्ट केले आहे. सनम कटोरीया या तरुणीचे एका अज्ञात व्यक्ती सोबत अनैतिक संबंध असल्याने त्याचा राग मनात धरून तिचा नवरा बापू धकनी उर्फ सचिन काटोरिया याने तिची धारदार शास्त्राने वार करून हत्या केल्याची कबूल केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक करून त्यांना पो. कस्टडी देण्यात आली आहे. सदरची यशस्वी कामगिरी वपोनि यशवंत चव्हाण, पोलीस उप निरीक्षक गणेश कड, एपीआय सानप, पो ना सचिन साळवी, पो ना योगेश बुधकर, पो ना नितीन भोसले, पो ना सुनिल पाटील, यांनी केली आहे.

Related Articles

Close