Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
रत्नागिरि

तिवरे धरण फुटले नाही तर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेने ते फोडले….

मागील दोन तीन वर्षे दुरुस्ती च्या प्रतीक्षेत असणाऱ्या तिवरे धरणाच्या दुरुस्तीकडे प्रशासन आणि जिल्ह्यातील जबाबदार लोकप्रतिनिधीनी अक्षम्य दुर्लक्ष केल्याने ही दुर्दैवी घटना घडली आहे असे सांगताना तिवरे धरण फुटले नसून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेने ते फोडले आहे अशी संतप्त प्रतिक्रिया गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी दिली आहे. मागील दोन वर्षांपासून धरण परिसरातील नागरिकांनी धरणाच्या गळती बाबत वारंवार प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे तक्रारी करून सुद्धा त्यावर ठोस कारवाई न झाल्याने व धरणाची तांत्रिकदृष्ट्या योग्य दुरुस्ती न झाल्याने ही घटना घडली असून या दुर्दैवी घटनेस पूर्णपणे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची उदासीनता जबाबदार आहे. विविध वर्तमानपत्रात धरण नादुरुस्ती बाबत बातम्या येऊनही धरणाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत संपूर्ण वाडी उद्धवस्त करून 24 जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या संबंधितांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सुहास खंडागळे यांनी केली आहे. जर हे धरण 2012 साली पूर्ण झाले तर त्यात अवघ्या पाच ते सहा वर्षात गळती कशी निर्माण झाली ? असा सवाल गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्हाच्या वतीने करण्यात आला आहे. धरण नादुरुस्त होते तर कोकणात होणाऱ्या प्रचंड पाऊसाची खबरदारी घेत येथील लोकवस्ती वेळीच स्थलांतरित का करण्यात आली नाही ? असा सवाल गाव विकास समितीने केला आहे. या दुर्दैवी घटनेत कुटुंब च्या कुटूंब उध्वस्त झाली असून सामान्य माणसाच्या जिविताशी खेळणाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी गाव विकास समितीने केली आहे.

Related Articles

Close