Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
ठाणे

४ गावठी कट्टा, १ रिव्हॉल्व्हर आणि ८ जीवंत काडतुसासह ९ जणांना अटक….

४ गावठी कट्टा, १ रिव्हॉल्व्हर आणि ८ जीवंत काडतुसासह ९ जणांना अटक करण्यात कळवा पोलिसांना यश आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, के.के. ज्वेलर्स, आनंद विहार, कळवा (पू) ठाणे येथे चार ते पाच अनोळखी इसमांनी शस्त्राचा धाक दाखवून सदर दुकानाच्या मालकास लुटण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गुन्हा कळवा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज आणि पुराव्याच्या आधारावर संशायित आकाश झूम्मा चौधरी यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी असता त्याच्यासोबत या गुन्ह्यात मुलचंद चौथी विश्वकर्मा, सुशीलकुमार लटूरीसिंग चौहान, मनोज उर्फ पप्पू शिवप्रसाद शर्मा, संदीपकुमार संसारबहादूर सिंग, धरमवीर गंगाराम पाशी, भोलेसिंग अमरसिंग सिंह, सत्तमसिंग श्रीशिवशंकर शुक्ला, सोनू उर्फ अमितसिंग रामप्रकाश सिंह यांचा सहभाग असल्याचे दिसून आले. तसेच त्यांच्याकडून ४ गावठी कट्टे, १ रिव्हॉल्व्हर, ८ जीवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले असून एकूण ६ गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी ठाणे, कळवा, टिटवाळा या ठिकाणांमधील विविध परिसरात चोरी करण्याची तयारी केली असल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी या ९ जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.

Related Articles

Close