Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
बीड

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढत राहील – राजू शेट्टी…..

सत्तेच्या सारीपाटात रमणारे राजकारणी आम्ही नाहीत, कष्टकरी शेतकर्यांहच्या हितासाठी लढणारी आमची शेतकरी जमात आहे, त्यामुळे एका पराभवाने खचून न जाता देशातल्या शेतकर्यां ना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहील, असा विश्वास शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथे व्यक्त करून, बदमाश कारखानदारांच्या विरोधात सत्य बोललो म्हणून सत्ताधाऱ्यांनी कारखानदारांना हाताशी धरून माझा पराभव केल्याचे त्यांनी सांगितले. मंगळवार, दि. ११ रोजी गेवराई येथील युवती प्रदेशाध्यक्षा पुजा मोरे यांच्या शेतकरी संघटनेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते, ते म्हणाले की, छावण्यांमध्ये जनावरांना चारा आणि पाणी मिळत नाही. त्यामुळे जनावरे तडफडून मरत आहेत. सरकारला काही देणे घेणे नाही. शेतकऱ्यांच्या हाताला काम नाही. विद्यार्थ्यांच्या फिस भरण्यासाठी पैसे नाहीत, घरात राशन नाही, सरकार सावकारी करणाऱ्या साखर कारखानदार आणि टॅन्कर माफियांचे असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला. मनसेचे राज ठाकरे, आ. बच्चू कडू , वंचित घटक आणि आम्ही सगळे एकत्र येऊन येणारी विधानसभा निवडणुक लढविणार असल्याचे सांगून ते म्हणाले की, सत्तेचे आम्ही भुकेले नाहीत, कष्टकरी शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठी निवडणूका लढवल्या आहेत. त्यामुळे पराभवामुळे खचून न जाता शेतकऱ्यांसाठी कायम लढत राहणार असल्याचे शेवटी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सांगितले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा प्रदेशाध्यक्षा पुजा मोरे, रोहिदास चव्हाण, जिल्हाध्यक्ष राजू गायके, वचिष्ट बेडके, युवा नेते सुग्रीव लाखे, विशाखा जाधव, अर्जुन सोनवणे, श्रीनिवास भोसले, अशोक वाघमारे, धनंजय मुळे, गंगाधर घोलप, सखाराम पायगुडे, सोमेश्वर जाधव, चिकणे काशीनाथ, रविंद्र ढवळे, नितिन लाटे, धनंजय मुळे, विलास जाधव, ज्ञानेश्वर राख, तांगडे मामा, सुनील लाखे, विश्वाम्बर टेकाळे, लक्ष्मण घोलप, बळीराम शिंदे, नारायन सुरवसे आदींची उपस्थिती होती. दरम्यान शहरात आगमन होताच, मराठवाडा विभागातून आलेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जुन्या बसस्थानका पासून शेट्टी यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून त्यांचे स्वागत केले.

Related Articles

Close