Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
कोल्हापूर

शहर, जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी….

शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात गुरुवारी दमदार पाऊस झाला. पावसाची रिपरिप रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. पावसाचा जनजीवनावर परिणाम झाला. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची नोंद झाली. कोदे धरण परिसरात 53 मि.मी.पाऊस झाला; तर गगनबावड्यात 33 मि.मी. पावसाची नोंद झाली. सलग सहाव्या दिवशी ‘मान्सूनपूर्व’ जोरदार बरसल्याने शेतकर्यांजना मोठा दिलासा मिळाला आहे. शहरात सलग पाच दिवस ‘मान्सूनपूर्व’ने हजेरी लावली. बुधवारी रात्री तर दमदार पाऊस झाला. गुरुवारी सकाळी दहा वाजेपर्यंत वातावरण ढगाळच होते. काही भागांत सकाळीही पाऊस झाला. त्यानंतर मात्र, वातावरण निरभ— झाले. अधूनमधून वातावरण ढगाळ होत राहिले. दुपारनंतर मात्र, जोरदार वार्याासह पावसाला प्रारंभ झाला. अधूनमधून विश्रांती घेत पावसाची रिपरिप सुरूच होती. सांयकाळ नंतर तर पावसाची काही काळ संततधारच सुरू होती. पावसाने जनजीवनावर परिणाम झाला. शहरातील अनेक मार्गांवर वाहतूक व्यवस्था कोलमडून गेली. भाऊसिंगजी रोड, स्टेशन रोड, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, उड्डाणपूल, ताराराणी चौक ते तावडे हॉटेल आदी मार्गांवर वाहतुकीची मोठी कोंडी झाली. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. उड्डाणपुलावर तर दोन्ही बाजूंना वाहनांची दाटी झाली होती. संथ गतीने वाहने पुढे सरकरत होती. पावसाने शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले. काही रस्त्यांवरही पाणी साचल्याने त्यातून मार्ग काढताना पादचार्यांचसह वाहनधारकांचीही कसरत सुरू होती. पावसाने अनेक रिक्षा थांब्यांवर रिक्षा मिळत नव्हत्या. काही मार्गांवरील केएमटीचे वेळापत्रकही कोलमडले. जिल्ह्याच्या धरण क्षेत्रातही गेल्या 24 तासांत चांगला पाऊस झाला. कोदे, राधानगरी, कुंभी, पाटगाव धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची नोंद झाली. कोदे परिसरात सर्वाधिक 53 मि.मी., राधानगरीत 31 मि.मी., पाटगाव परिसरात 33 मि.मी. व कुंभीच्या पाणलोट क्षेत्रात 40 मि.मी.पावसाची नोंद झाली. ‘चित्री’त 23 मि.मी., ‘तुळशी’त 15 मि.मी., ‘वारणे’त 10 मि.मी., ‘दूधगंगे’त 10 मि.मी., ‘कासारी’त 10 मि.मी., ‘चिकोत्रा’त 15 मि.मी., घटप्रभा परिसरात 20 मि.मी., ‘जंगमहट्टी’त 13 मि.मी., ‘जांबरे’त 10 मि.मी. पाऊस झाला. पावसाला सुरुवात झाल्याने धरणांत पाण्याची आवक होऊ लागली आहे. तुळशी धरणात 1 एमसीएफटी, वारणेत 20 एमसीएफटी, तर कुंभीत 6 एमसीएफटी पाण्याची आवक झाली. सध्या पाच धरणांतून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तुळशी धरणातून 200 क्युसेक, तर दूधगंगा धरणातून 475 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. वारणेतून 1385 क्युसेक धरणाचा विसर्ग होत आहे. कासारी धरणातून 180 व कुंभी धरणातून 250 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे पंचगंगेच्या पातळीतही संथ वाढ होत आहे. बुधवारी साडेआठ फुटांवर असलेली पातळी गुरुवारी साडेनऊ फुटांपर्यंत पोहोचली. राधानगरी : राधानगरीसह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेले दोन दिवस तुरळक बरसणार्याय पावसाने गुरुवारी दुपारनंतर दमदार सुरुवात केली. सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत धरण क्षेत्रात 31 मि.मी. पावसाची नोंद झाली. दोन दिवस पडणार्या् पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. तुरंबे : राधानगरी तालुक्यातील काळम्मावाडी, तुळशी, राधानगरी धरण परिसराबरोबर तालुक्यातील अनेक गावांत संध्याकाळी दमदार पावासाने हजेरी लावली. तुरंबे, कपिलेश्?वर, शेळेवाडी, तिटवे, सोळांकूर, सुळंबी, सरवडे, सोन्याची शिरोली आदी गावांतही सुमारे एक तास जीरवणीचा पाऊस झाला. कडगाव : भुदरगड तालुक्यातील कडगाव -शेळोली -तांबळे- वेसर्डे परिसरात दिवसभर संततधार सुरू होती. आता मान्सूनसदृश पाऊस पडत असल्यामुळे हा पाऊस मान्सून असावा, असा या परिसरातील शेतकर्यांमचा अंदाज आहे. वडणगे : शिये, जठारवाडी, भुयेवाडी, निगवे, वडणगे परिसरालाही गुरुवारी सायंकाळी पावसाने झोडपून काढले. औद्योगिक वसाहतीमधून येणार्यात कामगारांची या पावसामुळे दैना उडाली. रात्री उशिरापर्यंत अधूनमधून पाऊस कोसळत होता. 24 तासांत सरासरी 12.14 मि.मी. पाऊस जिल्ह्यात गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत सरासरी 12.14 मि.मी. पावसाची नोंद झाली. गगनबावड्यात सर्वाधिक 38 मि.मी. पावसाची नोंद झाली. चंदगडमध्ये 24 मि.मी., आजर्याोत 13 मि.मी., करवीरमध्ये 12.27 मि.मी., पन्हाळ्यात 10 मि.मी., गडहिंग्लजमध्ये 9.29 मि.मी., राधानगरीत 9 मि.मी., शाहूवाडीत 7.50 मि.मी., शिरोळमध्ये 4.86 मि.मी., कागलमध्ये 3 मि.मी. व हातकणंगलेत 3.38 मि.मी. पावसाची नोंद झाली.

Related Articles

Close