Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
कोल्हापूर

वंचित देवदासींच्या निवृत्ती वेतन प्रस्तवास मंजुरी देण्याबाबत मोर्चा….

महाराष्ट्रातील दलित समाजातील देवदासी गेली पंचवीस वर्ष रस्त्यावर उतरून सातत्याने आंदोलने करीत आहेत. मात्र राज्य शासनाने त्यांच्या न्याय मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. सन 1992 साली देवदासींचे सर्व्हेक्षण झाले मात्र वयाच्या अटीमुळे त्या हजारो देवदासींना 2005 पासून शासनाच्या लाभापासून वंचित राहिल्या त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यासाठी राज्य शासनाकडे कोणतीही ठोस योजना नाही. भाजपा-शिवसेना शासनाने गेल्या पाच वर्षात दलित समाजातील देवदास इन साठी काही केले नाही आणि उलट भूतपूर्व काँग्रेस - राष्ट्रवादीच्या शासनाचे देवदासी पुनर्वसन करण्याच्या अगोदर महाराष्ट्र देवदासी प्रथा निर्मूलन 2005 चा कायदा करून 2005 पूर्वीच्या देवदासींना आजही निवृत्तीवेतन, घरकुले आधी योजनांपासून वंचित ठेवल्याने अशा हजारो देवदासी आजही आपल्या पुनर्वसनासाठी प्रतिक्षा करीत आहेत. म्हणून 2005 पासून च्या सर्व देवदासींना संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा राज्य योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन प्रस्तावास त्वरित मान्यता द्यावी देवदास फिल्म सादर केलेल्या घरकुलाच्या प्रस्तावाला त्वरित मान्यता द्यावी. देवदासी, निराधार, वयोवृद्ध विधवा परितक्त्या माता-भगिनींना गेल्या दहा वर्षात फक्त सहाशे रुपये (600/-) अनुदान मिळते. त्यामध्ये वाढ करून दरमहा 2500/- रुपये निवृत्ती वेतन मिळावे. देवदासी कक्षाची स्वतंत्र कार्यालय सुरू करावे या व इतर प्रलंबित न्याय मागण्याच्या निषेधार्थ माजी नगरसेवक अशोक भंडारे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर शहर जिल्ह्यातील हजारो देवदासींनी कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून आपल्या प्रलंबित न्याय मागण्याच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने करून न्याय मागण्याचे सविस्तर निवेदन देवदासींच्या एका व्यापक शिष्टमंडळाने दौलत देसाईसो यांना सादर करून चर्चा केली. यावेळी देवदासींच्या मोर्चे समोर बोलताना अशोकराव भंडारे यांनी सन 1992 ला या कोल्हापुरातील देवदासींचे सर्वेक्षण झाले मात्र सर्वेक्षण करीत असताना वयाची अट घालून देवदासींना फक्त आणि फक्त निवृत्तीवेतनाचा लाभ दिला. त्याशिवाय त्यांचे योग्य पुनर्वसन केलेले नाही. आणि पुरोगामी म्हणवण्याचा राज्य शासनाने सन 2005 साली महाराष्ट्र देवदासी प्रथा निर्मूलनाचा कायदा करून तमाम दलित समाजातील देवदासीवर घोर अन्याय केला आहे. देवदासी प्रथा 2005 कायद्याचा चुकीचा अर्थ लावून 2005 पूर्वीच्या देवदासींना पंचवीस वर्षापासून शासनाच्या सर्व योजनांपासून वंचित ठेवले आहे. या अन्यायकारक कायद्यामध्ये त्वरित दुरुस्ती करून 2005 पूर्वीच्या पंचवीस वर्षापासून वंचित असणाऱ्या देवदासींना निवृत्तिवेतन व घरकुले प्रस्तावास मंजुरी देण्याची मागणी या मोर्चे समोर बोलताना अशोकराव भंडारे यांनी यावेळी केली. तसेच गेल्या दहा वर्षात विधवा देवदासी वयोवृद्ध निराधार पेन्शन मध्ये वाढ करून 2500/- रुपये दरमहा पेन्शन वाढ देण्याची मागणी यावेळी केली. या मोर्चाद्वारे माजी नगरसेविका मायादेवी भंडारे यांनी हे आंदोलन जोपर्यंत आपल्या न्याय मागण्या मंजूर होत नाहीत तोपर्यंत जोमाने चालू ठेवण्याचे आवाहन यावेळी केले. मोर्चाची सुरुवात माहेर गार्डन ते खानविलकर पेट्रोल पंप मेन रोड ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी होती. या आंदोलनात माजी नगरसेविका मायादेवी भंडारे, पंकज भंडारे, नसीम देवडी, शारदा पाटोळे, रेखाताई वडर, देवा साळुंखे, रेणुका वाघमारे, छाया चित्रुक, दिलीप चित्रुक,शिवाजी शिंगे, पिराजी कांबळे, रमेश साठे, योगेश गवळी, राकेश ठोकळे, शांताबाई पाटिल,इ. देवदासी प्रमुख कार्यकर्त्यांसह कोल्हापूर शहर, हातकणंगले, इचलकरंजी, कागल, हुपरी, शाहूवाडी, सांगरूळ इतर भागातील असंख्य देवदासी वाघ्या मुरळी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

Related Articles

Close