Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
बीड

कै. हरिभाऊ कराड चारा छावणीमुळे पशुधनाला जीवनदान, शेतकऱ्यांना दिलासा – भागवत मुंडे….

तालुक्यातील परळी - बीड रोडवरील मौजे लिंबोटा येथे परळी तालुका दुग्ध संघाच्या वतीने कै.हरिभाऊ कराड गुरांची चारा छावणी गेल्या एक महिन्यापासून सुरू आहे. लिंबोटा तसेच परिसरातील शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी येथील भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी छावणी सुरू करुन सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रेसर असतात त्यांनी सुरु केलेल्या या छावणीमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या गुरांना खुप मोठा आधार मिळाला आहे. पशुधनाला एक प्रकारे आधार भेटल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असल्याचे प्रतिपादन तळेगाव येथील शेतकरी तथा जयहिंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष भागवत मुंडे यांनी केले आहे. तालुक्यातील परळी विधानसभा मतदारसंघा मधील दुष्काळाची तीव्रता, मान्सून लक्षात घेता. आणखी दोन महिने पाणी आणि चारा उपलब्ध होऊ शकणार नाही. या पार्श्वभूमीवर कराड यांनी लिंबोटा येथे परळी तालुका दुग्ध प्रकल्प परिसर, कै.हरिभाऊ कराड चारा छावणी सुरू केली आहे. या छावणीला तळेगाव येथील शेतकरी भागवत मुंडे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या व तरुण बांधवांच्या समस्या जाणून घेऊन प्रशासनामार्फत त्या समस्या सोडवण्यासाठी व शेतकऱ्यांच्या हितासाठी भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी शेतकऱ्यांच्या वेळोवेळी पाठीमागे उभे राहून प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मुंडे यांनी सांगितले. लिंबोटा येथील छावणीत लिंबोटा व परिसर येथील शेतकऱ्यांचे जनावरे आहेत. शेकऱ्यांना राहण्याची सोय केली आहे. गुरांना नियमाप्रमाणे ओला सुका व हिरव्या चाऱ्याची सोय करून नियामा प्रमाणे वाटप करण्यात येत आहे. पशुधनाची संख्येचा फलक छावणीत प्रवेश करताच दिसत आहे. यावरुन छावणीचे नियोजन पारदर्शकता सहज दिसून येते. पाण्याच्या नियोजनाची चौक व्यवस्था केली आहे. प्रत्येक दावणीला पाण्याची सोय केली आहे. जनावरांच्या पाण्याची तहान बोर व टँकर वर भागत आहे. तसेच गुरांची तपासणी व लसीकरण खाजगी डॉक्टर मार्फत करण्यात येते. छावणीमुळे वीस ते पंचवीस मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. आतापर्यंत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, त्रिपुराचे आयुक्त किरणकुमार गित्ते, जिल्हाधिकारी डॉ. अस्तिकुमार पांडे, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी अमोल येडगे, परळीचे उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, परळीचे तहसीलदार डॉ. विपिन पाटील व जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले आहे. पिंपरी बु. गटातील उत्कृष्ट चारा छावणी म्हणून बरेच शेतकरी व सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी छावणीचे नियोजन पाहण्यासाठी आवर्जून येतात. फुलचंद कराड यांनी अत्यंत नियोजनबद्ध पध्दतीने सुरू केलेल्या चारा छावणी 600 पेक्षा जास्त पशुधन आहे. शासनाकडून परवानगी उशिरा मिळाली असली तरी फुलचंद कराड यांनी मात्र छावणीतील जनावरांनासाठी स्वतःच चारा, पाण्याची व्यवस्था केली. 15 दिवसापासून दररोज छिवणीवर जाऊन शेतकऱ्यांची व त्यांच्या पशुधनाची चौकशी करीत आहेत. जनावरांची संख्या, त्यांना लागणारे वैरण, पिण्याचे पाणी व इतर सुविधा पुर्णपणे उपलब्ध आहेत का याची ते जातीने काळजी करीत आहेत. सध्या छावणी मध्ये 600 जनावरे असून छावणीतील पशुधन सुरक्षित राहावे, अन्नापाण्यापासून ते वंचित राहू नयेत यासाठी ते स्वतः लक्ष देऊन सुचना करीत आहेत. फुलचंद कराड यांनी सुरू केलेल्या चारा छावणीमुळे परिसरातील पशुधनाची सोय झाली असल्याचे जयहिंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष भागवत मुंडे यांनी सांगितले.

Related Articles

Close