Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
ठाणे

भिवंडीत मुलाचे अपहरण केलेल्या आरोपीस अटक….

भिवंडीतून १ वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या आरोपीस भिवंडी पोलिसांनी अटक केली आहे. रोहित प्रदीप कोटेकर असे या आरोपीचे नाव आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, भिवंडीतील धामणकर नाका पुलाच्या खाली भाजी मार्केट पद्मा नगर येथून रात्रीच्या वेळी आपला एक वर्षाचा मुलगा कुमार अशिक हरजन हा आपल्या आईच्या कुशीत झोपलेला असताना त्याचे अपहरण झल्याची तक्रार या मुलाचे वडील चंदूल हरजन यांनी भिवंडी पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर सदर गुन्ह्याचा तपास करत असताना मिळालेल्या माहितीच्या आधारावर रेकॉर्डवरील वाहन चोरी करणारा रोहित प्रदीप कोटेकर यास अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा आपला साथीदार व रेकॉर्डरवरील वाहन चोर सुरज रमेश सोनी याच्या मदतीने कर्ज फेडण्याकरीता केला असल्याचे कबुल केले तसेच अपहरण केलेल्या मुलाला उत्तर प्रदेशातील नेपाळ हद्दीत लागून असलेल्या गावात विक्री केले असल्याचे सांगितले या मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी तातडीने सदर ठिकाणी जाऊन अपहरण झालेल्या मुलाची सुटका केली आणि या मुलाला त्याच्या आई - वडिलांकडे सूपूर्द केले.

Related Articles

Close