Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
बीड

राज्यभरातील सोशल मिडिया समन्वयक, निमंत्रकांच्या नियुक्त्या घोषित….

मराठी पत्रकार परिषद, मुंबईच्या वतीने राज्यभरातील सोशल मिडिया समन्वयक, निमंत्रकांच्या नियुक्त्या वडवणी जि. बीड येथे रविवार ९ जुन रोजी घोषीत करण्यात आल्या या वेळी परभणी जिल्हा निमंत्रक म्हणून तेजन्यूजचे संपादक किरण घुंबरे, तर समन्वयक म्हणून लोकसमिक्षाचे प्रभू दिपके यांची तर औरंगाबाद,लातूर विभागाचे समन्वयक म्हणून हनुमंत चिटणीस यांची दोन वर्षा साठी निवडीचे पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली. राज्य भरातील आदर्श जिल्हा पत्रकार संघ आणि तालुका पत्रकार संघाना विभागवार आदर्श पत्रकार संघाचा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन वडवनी येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मराठी पत्रपरिषदेचे मुख्य विश्वस्त तथा पत्रकार हल्ला कृती समितीचे अध्यक्ष एस एम देशमुख हे होते तर स्वागताध्यक्ष अमोल आंधळे प्रमुख उपस्थितीत सकाळचे कार्यकारी संपादक संजय वरकड, मराठी पत्रपरिषदेचे मुंबई विश्वस्त सिद्धार्थ शर्मा,रमेशराव आडसकर, माजी आ आंधळे यांची उपस्थिती होती.या वेळी राज्यभरातील आदर्श पत्रकार संघांना परिषदेच्या वतीने पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. याच वेळी राज्यातील मराठी पत्रपरिषदेच्या समन्वयक आणि निमंत्रकांच्या निवडीचे पत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या निवडी बद्दल पाथरी तालुका पत्रकार संघ आणि जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने तीघांच्या निवडीचे स्वागत करण्यात आले.

Related Articles

Close