Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
अहमदनगर

पहाटेच्या झोपेत चालकाचा ताबा सुटला, भीषण अपघातात 3 ठार 1 जखमी….

नगर पुणे महामार्गावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून एक जखमी आहे. जखमीला जवळील रुग्णायात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांमधील सर्वच व्यक्ती हे धुळ्याचे रहिवाशी होते. पुण्याकडून नगरकडे जाणाऱ्या रोडवर जातेगाव फाट्याजवळ उभ्या असणाऱ्या ट्रकला पाठिमागून आलेल्या स्कार्पिओ गाडीने जोराची धडक दिली. पहाटेच्या झोपेत चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या या अपघातात तीन जण ठार झाले व एक जखमी झाला आहे. जखमींना तात्काळ उपचारासाठी पाठवले आहे. पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतल्यानंतर रस्ता सुरळीत चालू असून कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्न नाही.

Related Articles

Close