Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
मुंबई

जॉय सामाजिक संस्थेची विद्यार्थ्यांना मदत….

विरार पूर्वेकडील भाताणे गावात विशाल परूळेकर हा तरुण आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि त्यांच्या मुलांसाठी चालवित असलेल्या "साई आधार" ह्या विनाअनुदानित संस्थेत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुला मुलींना हा तरुण आणि त्याची बायको अंकिता परूळेकर मायेने, जबाबदारीने सांभाळत आहेत. तसेच साई आधार ही संस्था कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय चालविली जात असल्याने ही गरज ओळखून जॉय सामाजिक संस्था जोगेश्वरी तर्फे सामाजिक बांधिलकी जपत येथील विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तू व शैक्षणिक साहित्य देऊन मदत करण्यात आली. यावेळी असूंता डिसोझा,शीला येरागी,मीना भुतकर,भूषण मुळे, दत्ता रातवडकर,श्रीराम कानडे,रमेश गावंड गणेश हिरवे हे जॉयचे कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्याशी संवाद साधत त्यांना शैक्षणिक मागदर्शन करण्यात आले. गेल्या दोन वर्षात जॉय तर्फे महाष्ट्रातील विविध आश्रमशाळा, वृद्धाश्रम,अनाथालय या ठिकाणी जाऊन नेहमीच मदत पोहचविण्यात आलेली आहे, यापुढेही हे सामाजिक कार्य असेच सुरू राहील असे जॉयचे संस्थापक अध्यक्ष गणेश हिरवे यांनी सांगितले.

Related Articles

Close