Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
ठाणे

घरफोडी करून चोरी करणाऱ्या एका महिलेस अटक….

घरफोडी करून चोरी करणाऱ्या एका महिलेस वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे. मिन्नती दुर्योधन गौडा असे या महिलेचे नाव असून तिने फिर्यादीच्या घराचे कुलूप उघडून हिरेजडित सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली असल्याचे कबूल केले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, भावेश प्रकाश मीर्गनानी या व्यक्तीने वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात त्यांच्या घराचे कुलूप उघडून घरातील ६, ८५,०००/- रु. चे हिरेजडित सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची फिर्याद नोंदविली होती. या फिर्यादीवरून वागळे इस्टेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला होता. या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला असता मिन्नती दुर्योधन गौडा हि फिर्यादीच्या घरात पूर्वी घरकाम करत असल्याचे निष्पन्न झाले. तसेच पूर्वी घरकाम असतानाच फिर्यादीच्या घरातील मुख्य दरवाजाची एक चावी फिर्यादीच्या नकळत स्वतःहा जवळ ठेवून घेतली होती. त्यांनतर त्या चावीचा वापर करून फिर्यादी घरात नसताना हि चोरी केल्याचे कबुल केले आणि नंतर हे दागिने तिच्या घरातील एका पेटीमध्ये लपवून ठेवल्याचे सांगितले. सदर प्रकरणी या महिलेला १० /०६ जून पर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे.

Related Articles

Close